जगविख्यात ‘अ‍ॅमनेस्टी’स्वयंसेवी संस्थेनं भारतातील काम केलं बंद; मोदी सरकार सूडबुद्धीने मागे लागल्याचा केला आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या जगविख्यात स्वयंसेवी संस्थेने मंगळवारी भारतामधील आपले कामकाज थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. एका करावाईच्या नावाखाली केंद्रातील मोदी सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला संस्थेची काही बँक अकाऊंट फ्रीज केली. त्यानंतर संस्थेना नाईलाजाने अनेक कर्मचाऱ्यांना कमावरुन काढावं लागलं होतं. भारत सरकारकडून मानवाधिकारासंदर्भात काम करणाऱ्या संस्थांच्या विरोधात चालवण्यात येणाऱ्या विच हंट (हात धुवून मागे लागण्याचा प्रकार) मोहिमेतील हा पुढचा टप्पा असल्याचे अ‍ॅम्नेस्टीने जरी केलेल्या पत्रकांत म्हटलं आहे.

अ‍ॅम्नेस्टीने पत्रकात म्हटलं कि, “भारत सरकारकडून अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे बँक खाती पूर्णपणे गोठवण्यात (फ्रीज करण्यात) आली आहेत. ज्यासंदर्भातील माहिती संस्थेला १० सप्टेंबर रोजी मिळाली. यामुळे संस्थेचे काम पूर्णपणे ठप्प झालं आहे,” असं अ‍ॅम्नेस्टीने पत्रकात म्हटलं आहे. संस्थेला नाइलाजास्तव आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढावं लागलं असून देशामध्ये सुरु असणारे संस्थेची सर्व कामं आणि संसोधन थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याचेही पत्रकात नमूद केलं आहे.

“संस्थेवर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. अशाप्रकारची कारवाई म्हणजे, भारत सरकारकडून मानवाधिकारासंदर्भात काम करणाऱ्या संस्थांच्या विरोधात चालवण्यात येणाऱ्या विच हंट (हात धुवून मागे लागण्याचा प्रकार) मोहिमेतील हा पुढचा टप्पा आहे,” असा गंभीर आरोप या पत्रकामध्ये अ‍ॅम्नेस्टीने केला आहे. संस्थेने सर्व भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करुनच देशात काम केल्याचंही अ‍ॅम्नेस्टीने म्हटलं आहे.

अ‍ॅम्नेस्टीने सरकारविरोधात आवाज उठवल्यानेचं हे सारं घडलं
अ‍ॅम्नेस्टीचे कार्यकारी संचालक अविनाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मागील दोन वर्षांपासून सरकार अ‍ॅम्नेस्टीवर कारवाई करत आहे. प्रवर्तन निर्देशालयापासून ते इतर सरकारी संस्थांकडून होणारे शोषण, केंद्र सरकारच्या पारदर्शक कामाची मागणी, दिल्ली दंगलींमध्ये दिल्ली पोलीस आणि भारत सरकारची जबाबदारी काय आहे यासंदर्भातील आणि दिल्ली तसेच जम्मू-काश्मीमध्ये मानवाधिकारांचे होणारे उल्लंघनाविरोधात अ‍ॅम्नेस्टीने आवाज उठवल्याने हे सारं घडत आहे. ज्या ज्या मोहिमेने अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे त्याविरोधातील ही कारवाई आहे. संस्थेच्या कामाला विरोध करण्यासाठी ही करवाई करण्यात आली आहे.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment