मोहित कंबोज भाजपचा भोंगा; अमोल मिटकरींचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता लवकरच तुरुंगात जाईल असं ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केल्यांनतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली. त्याच पार्श्वभूमीवर कंबोज यांच्या या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. मोहित कंबोज हा भाजपचा भोंगा आहे. ईडी चौकशीची माहिती त्याला कशी मिळते याचीच उलट चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. अमोल मिटकरी यांनी विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कंबोज यांच्यावर निशाणा साधला.

मिटकरी म्हणाले, मोहित कंबोज हा भाजपचा भोंगा आहे. लष्कर ए देवेंद्र मधील तो तिसऱ्या फळीतील नेता आहे. हा माणूस कधी शेतकऱ्यांवर बोलताना दिसत नाही. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर चर्चा भरकवटण्यासाठी त्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. ईडी किंवा सीबीआय कुठे चौकशी करत हे मोहित कंबोजला कस माहित पडत?? असा सवाल करत मोहित कंबोज हा ईडीच्या कार्यालयात बसणारा कार्यकर्ता आहे का याची चौकशी करण्यात यावी असं मिटकरी म्हणाले. मोहित कंबोज हा कोणाचा कार्यकर्ता आहे, कोणाच्या चड्डीचा नाडा आहे हे सर्वाना माहित आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

मोहित कंबोज यांचं ट्विट काय ??

राष्ट्रवादीचा एक मोठा मोठा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासोबत आर्थर रोड जेलमध्ये असेल, असे मोहित कंबोज म्हणाले. याबाबत आपण लवकरच पत्रकार परिषद घेणार असून या नेत्याचा पर्दापाश करणार आहोत असेही ते म्हणाले. त्यामध्ये देश आणि विदेशालील मालमत्तांची यादी, बेनामी कंपन्यांची नावे, गर्लफ्रेंडच्या नावे घेतलेल्या मालमत्ता, विविध खात्यांचा कारभार सांभाळताना केलेला भ्रष्टाचार, कुटुंबाचे उत्पन्न आणि मालमत्तांची यादी असे जाहीर करणार आहे, असे कंबोज यांनी सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.