धक्कादायक ! अमरावतीमध्ये 35 वर्षीय महिलेचा शेतात मृतदेह आढळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका शेतात 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हि घटना अमरावती जिल्ह्यातील धारणी पासून 20 किमी अंतरावर असलेल्या बिजुधावडी ते हातिदा गावादरम्यानच्या शेतात घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच धारणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या महिलेची ओळख अजून पटलेली नाही. मात्र तिची अज्ञात व्यक्तीकडून दगडाने ठेचून हत्या केल्याचे प्राथमिकदृष्ट्या समजत आहे.

काय आहे प्रकरण?
35 वर्षीय महिलेचा मृतदेह अमरावती जिल्ह्यातील धारणी पासून 20 किमी अंतरावर असलेल्या बिजुधावडी ते हातिदा गावादरम्यानच्या शेतात सापडला. या घटनेची माहिती मिळताच धारणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.

डोक्यात दगड घालून हत्येचा संशय
या महिलेच्या मृतदेहाची अवस्था पाहता डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे व पोलीसाचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या महिलेची अजून कोणतीच ओळख न पटल्याने पोलिसांनी आजूबाजूच्या गावातल्या पोलीस पाटलांना घटनास्थळी बोलावून या महिलेची ओळख पटवण्यास सांगितले.

Leave a Comment