हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल नुकताच हाती आला असून या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे हे विजयी झाले आहेत. भाजपच्या रणजीत पाटील यांचा त्यांनी पराभव केला आहे.
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपच्या वतीने रणजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर करत निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. दरम्यान आज पाटील यांच्या पराभवाचा भाजपला मोठा धक्का बसला आहे. लिंगाडे यांना या निवडणुकीत एकूण 46 हजार 330 मते मिळाली. तर रणजित पाटील यांना 42 हजार 962 मते मिळाली.
पदवीधर मतदारसंघासाठी एकुण २३ उमेदवार रिंगणात होते. अमरावती जिल्ह्यात ३५ हजार २७८ पदवीधर मतदारांची नोंदणी झाली होती. यात २३ हजार ७८५ पुरुष तर ११४९३ महिला मतदारांचा समावेश होता. सुमारे २० हजार ७६८ मतदारांनी मतदान केले होते. यात १४ हजार ९५२ पुरुष तर ५ हजार ८१६ महिलांनी मतदान केले होते. यवतमाळ जिल्ह्यात ४८ मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व संबंधितांच्या ५३ चमू कार्यरत होत्या. मतदान प्रक्रियेमध्ये २७६ अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.