Tuesday, October 4, 2022

Buy now

अमरावतीतील लव्ह- जिहाद प्रकरणातील बेपत्ता तरुणी सापडली; सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती येथील आंतरधर्मीय विवाह प्रकरण चांगलंच तापलं आहे. एका हिंदू मुलीला एका मुस्लिम तरुणाने पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांनाच खडेबोल सुनावत २ तासांत मुलीला शोधून आणण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता या तरुणीचा शोध लागला असून पश्चिम महारष्ट्रातील सातारा पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे.

अमरावतीच्या पोलीसांनी काल रात्रीपासून मुलीचा तपास सुरु केला होता. ठिकठिकाणी नाकाबांदी करत पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. या मुलीचे लोकेशन पुणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत असल्याने तिचा शोध व्हावा अशी विनंती लोहमार्ग पोलिसांना करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी माहिती घेताच ही मुलगी निजामुद्दीन ते वास्को-द-गामा गोवा एक्सप्रेसने गोव्याच्या दिशेने प्रवास करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. ही ट्रेन सातारा या ठिकाणी असल्याने पोलिसांनी स्टेशन मास्तर यांना फोन करून गाडी स्टेशनवरच थांबवावी अशी विनंती केली. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या मुलीला ताब्यात घेतले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अमरावती खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्याचे कालच पाहायला मिळालं होत. या संपूर्ण प्रकरणामुळे अमरावतीची बदनामी होत आहे. पूर्ण अमरावतीमध्ये लव्ह जिहाद प्रकरण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. त्या मुलाला पकडून आणलं आहे. रात्रीपासून पोलीस त्याची चौकशी करत आहेत, मात्र तरीही ती मुलगी अजून कशी काय सापडली नाही असा सवाल नवनीत राणा यांनी पोलिसांना केला. तसेच पोलिसांनी नवनीत यांचा कॉल रेकॉर्डिंग केल्यानेही त्यांनी पोलिसांना खडेबोल सुनावले होते.