अखेर खासदार नवनीत राणांना मुंबईतील लिलावती रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । प्रकृतीत झपाट्यानं सुधारणा झाल्यामुळं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, जरी डिस्चार्ज मिळाला असला तरी त्यांना पुढील २० दिवस क्वारंटाइन राहावं लागणार आहे. याआधी त्यांचे पती आमदार रवी राणा यांनाही शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यांनाही करोनाची लागण झाली होती. ते आता कोरोनामुक्त झाले असून त्यांना शनिवारी रात्री रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

नवनीत राणा यांना ६ ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. सुरुवातीला अमरावतीतील घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, पाच दिवसानंतरही प्रकृतीत काहीच सुधारणा न झाल्यानं त्यांना नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्यांना नागपूरमधील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नागपूरमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांच्या प्रकृती अधिकच खालावली.

त्यानंतर नवनीत राणा यांना तातडीनं मुंबईला हलवण्यात आलं होतं. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी त्यांना आयसीयूतून सर्वसाधारण कक्षामध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काल रात्री त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आयसीयूतून बाहेर आल्यानंतर शनिवारी संध्याकाळी नवनीत राणा यांनी फेसबुकवरून एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. आपल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले होते. तसंच, लवकरच आपल्या सेवेत रुजू होईन, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment