अमरावती शिक्षक मतदारसंघ: किरण सरनाईकांची विजयाकडे वाटचाल; महाविकास आघाडीचा उमेदवार 966 मतांनी पिछाडीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती । विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाची धामधूम सुरु आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार 966 मतांनी पिछाडीवर आहे. दुसऱ्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून अपक्ष उमेदवार किरण सरनाईक 966 मतांनी आघाडीवर आहेत. किरण सरनाईक यांना आतापर्यंतच्या मोजणीत एकूण 6088 मतं मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 5122 मतं मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार शेखर भोयर तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांना 2811 मतं मिळाली आहेत. (amravati teacher constituency election result)

दोन्ही फेऱ्या मिळून 29 हजार 829 वैध मत तर 1 हजार 89 मतं अवैध ठरली असून एकूण 30,918 मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. सरनाईक यांना दुसऱ्या फेरीत 2957 मतं, महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 2822 मतं. तर अपक्ष उमेदवार शेखर भोयर यांना 2811 मतं मिळाली आहेत.  (Maharashtra Graduate and Teacher Constituency Elections Result)

अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक, पहिल्या फेरीचा निकाल
पहिल्या फेरीत वैध 13 हजार 999 मतांपैकी 488 अवैध तर 13 हजार 511 मते वैध ठरली. या फेरीतील मते अशी : डॉ. नितीन धांडे- ६६६, श्रीकांत देशपांडे – २३००, अनिल काळे – १२, दिलीप निंभोरकर- १५१, अभिजित देशमुख – ९, अरविंद तट्टे- १३, अविनाश बोर्डे- ११७४, आलम तनवीर- ९, संजय आसोले- ३०, उपेंद्र पाटील- २१, प्रकाश कालबांडे- ४३७, सतीश काळे-७८, निलेश गावंडे- ११८३, महेश डावरे-१४१, दिपंकर तेलगोटे-६, डॉ. प्रवीण विधळे-७, राजकुमार बोनकिले-३४८, शेखर भोयर- २०७८, डॉ. मुश्ताक अहमद- ८, विनोद मेश्राम – ७, मो. शकील- १४, शरद हिंगे- २५, श्रीकृष्ण ठाकरे- १०, किरण सरनाईक – ३१३१, विकास सावरकर – ३१४, सुनील पवार- ३५, संगीता शिंदे- १३०४.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment