Saturday, March 25, 2023

अमरावती च्या येसुर्णा गावामधे खबरदारी म्हणूण गावबंदी

- Advertisement -

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई

अमरावती जिल्हा च्या येसुर्णा गावामधे आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखन्यासाठी ग्रामस्थांनी गावबंदीचा निर्णय घेतलेला आहे. तर अत्यावश्यक सेवा अँब्युलन्स ,पोलीस व्हॅन, शेतकरी, गरजूलोकांसाठी येजा करण्याकरीता रस्ता खूला ठेवलेला आहे.

- Advertisement -

कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणूण गावामधे येणार्‍या कोणत्याही नागरीकांची आधी नोंद केल्या जाते व नंतरच अत्यावश्यक असल्यास त्याचा संपर्क गावातील त्या व्यक्तीसोबत करवुन दील्या जातोय. मात्र गावामधे कोणत्याही परीस्तीती मधे संबंधीत व्यक्तीला पाठवीन्यात येत नाही. त्यामूळे या गावात आता गावबंदी असुन कोनीही अनोळखी व्यक्ती पाहूणा विना परवानगी विना तपासणी गावामधे येऊ शकत नाही.

यासाठी पं. समीतीचे ऊपसभापती श्रीधर काळे , सरपंच भारती काळे, शिवसेनेचे नरेंद्र पडोळे,पोलीस पाटील जीवन काऴे,आदींनी अत्यावश्यक सेवेसाठी नागरीकांना सहकार्य सुद्धा केले जात असल्याने गावाने एक आदर्श निर्माण केलेला आहे. येसूर्णा गावाची तालूक्यातून प्रशंसा केली जात आहे.