मतदानासाठी लंडनवरून थेट कसब्यात; तरुणीने बजावला मतदानाचा हक्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु झाली असून अनेक जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे यावेळी मतदानासाठी एक तरुणी चक्क लंडनहून कसब्यात आली आणि तीने मतदान सुद्धा केलं. अमृता देवकर असं सदर हौशी तरुणीचे नाव आहे.

अमृता देवकर या लंडनच्या मँचेस्टरमध्ये नोकरीसाठी कार्यरत आहेत. जवळपास 24 तासांचा प्रवास करून आज सकाळी 7 वाजता त्या पुण्यात आल्या आणि सकासकाळीच त्यांनी आपलं मतदानाचं हक्क बजावला. मी ज्या दिवशी येणार आहे. त्याच दिवशी मतदान होणार आहे असं मला कळलं. मग म्हटलं माझा मतदानाचा हक्क का सोडावा अस म्हणत मतदानाचा हक्क कोणीही चुकवू नये, आपणच लोकांना दिशा देणार आहे त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन यावेळी अमृता देवकर यांनी केलं.

दरम्यान, भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळाला आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसकडे गेली असून रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून हेमंत रासने हे रिंगणात आहेत. कसब्यात सकाळपासुन धीम्या गतीने मतदान सुरु आहे. सकाळी 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत अवघे 6.5 टक्के मतदान झाल्याचे पाहायला मिळालं.