Monday, February 6, 2023

अमित शाह आधुनिक भारताचे चाणक्य ; वाढदिवसानिमित्त अमृता फडणवीसांनी दिल्या हटके शुभेच्छा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज वाढदिवस आहे. अमित शहा यांनी आज वयाच्या ५६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. वाढदिवसा निमित्त राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते विरोधी पक्षातील नेत्यांपर्यंत सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून अमित शाह यांना शुभेच्छा देत आहेत. दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही अमित शाह यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी अमित शाह यांचा उल्लेख आधुनिक भारताचे चाणक्य असा केला आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आधुनिक भारताचे चाणक्य अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

- Advertisement -

२०१४ साली राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाल्यापासून अमित शाह यांनी पक्षावर सुद्धा तितकीच घट्ट पकड मिळवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी अशी अमित शाह यांची ओळख आहेच. पण शिस्तबद्ध पद्धतीने काम करुन अमित शाह यांनी स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे.

२०१४ ते २०१९ दरम्यान भाजपाने अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली एकापाठोपाठ एक विजय मिळवत देशभरात भाजपाचा विस्तार केला. अमित शाह भाजपाचे चाणक्य म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. २०१९ मध्ये अमित शाह यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली व गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून तब्बल साडेपाच लाख मताधिक्याने विजय मिळवला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’