दुर्दैवी ! अज्ञात टिप्परने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परसोडी/नाग : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने राज्य सरकारने कोरानाचे राज्यातील सर्व नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे आता तब्बल दोन वर्षानंतर राज्यात सगळे कार्यक्रम धामधुडाक्यात साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाच्या निर्बंधांमुळे ज्यांची लग्ने रखडली होती ती आता धुमधडाक्यात करण्यात येत आहेत. पण त्यातच अपघात होण्याचे प्रमाणही वाढल्याने अनेकांच्या घरात होत्याचं नव्हतं होत आहे. अशीच एक घटना लाखांदूर तालुक्यातील परसोडी/नाग ते पाऊनगाव मार्गावर घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
गावातील मित्राच्या लग्नाला दुचाकीने जाताना एकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे. मंगेश राजकुमार भागडकर असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे तर विकेश सुरेश करणकर असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमी विकेशला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील मित्राच्या लग्नासाठी मृत मंगेश आणि विकेश दुचाकीने जात होते. त्यांची दुचाकी लाखांदूर तालुक्यातिल परसोडी/नाग ते पाऊनगाव मार्गावर आली असता विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात टीप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी त्या दोघांना उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यामध्ये मंगेश गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान मंगेशचा मृत्यू झाला. तर जखमी विकेश वर स्थानिक लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लाखांदूर पोलिसांना या अपघाताची माहिती देण्यात आली असून पोलिस आरोपी टिप्पर चालकाचा शोध घेत आहेत.

Leave a Comment