कराड बस स्थानकाबाहेर बेवारस बॅग पाहून एकच खळबळ ; बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सकलेन मुलाणी । सातारा

कराडात धक्कादायक प्रकार घडला असून बस स्थानक परिसरात बेवारस बॅग सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे, सातारा बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले असून घटना स्थळावर प्रचंड गर्दी झाली आहे. येथील बस स्थानक समोरील तृप्ती लॉज,व वेलनेस मेडिकल या दुकानांच्या समोर एक बेवारस प्रवाशी बॅग दिसून आली होती. सकाळी दिसलेली ही बॅग दुपारपर्यंत तशीच होती,अनेक जणांच्या नजरा या बॅग वर होत्या परंतु कोणीही या बाबत पोलीस यंत्रणेशी अथवा संबंधित यंत्रणेशी सांगून अथवा संपर्क केला नाही, मात्र सायंकाळी पोलिस प्रशासनाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी रणजित पाटील यांनी तात्काळ याची दखल घेत बॉम्बशोधक पथकास प्राचारण करीत घटनास्थळी दाखल झाले.

वेलनेस मेडिकलच्या समोर ही बेवारस प्रवासी बॅग होती. बाॅम्ब शोधक पथकाने तात्काळ आपली यंत्रणा वापरतात बॅगची तपासणी व पाहणी केली, यावेळी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान सकाळी बेवारस स्थितीत असलेली ही बॅग सायंकाळपर्यंत अशीच असल्याने याबाबत कमालीची उत्सुकता वाढली होती. मात्र जबाबदार नागरिक या नात्याने वेळीच या बॅगेची माहिती पोलिस प्रशासनास देण्याची जबाबदारी संबंधित दुकान मालक यांची होती, त्यांनी याबाबतची माहिती उशिरा पोलीस प्रशासनात कळविल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली,

रात्री आठच्या दरम्यान पोलीस प्रशासन बॉम्बशोधक पथकासह घटनास्थळी दाखल झाले संबधित बॅगची तपासणी केल्यानंतर बॉम्बशोधक पथकाने ती बॅग ताब्यात घेतली.या मध्ये सातारा पोलिस दलातील बाॅम्ब शोधक पथकातील डाॅगसह आपल्या सहकार्‍यांसह तात्काळ दाखल होऊन घटनास्थळाची परस्थिती हाताळली.

दरम्यान त्या बॅगेत काय होते ती कुणी ठेवली आहे हे अजून समजून आलेले नाही, सबंधित बॅग पोलिस व्हॅन मध्ये घालून निर्जन स्थळी घेऊन त्याची तपासणी करण्याचे काम अद्याप सूरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment