आंध्रा टू कराड : सायकलवरून दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून येणार शिवज्योत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोपर्डे हवेली (ता.कराड) येथील धर्मवीर संभाजी मंडळाचे कार्यकर्ते शिवज्योत आणण्यासाठी आंध्रप्रदेशात गेले आहेत. सोमवारी 2 मे शिवजयंती दिनी शिवज्योत घेवून कोपर्डे हवेली येथे पोहचणार आहेत. कोपर्डे- आंध्रा- कोपर्डे असा जवळपास 1500 किलोमीटर प्रवास करून आंध्रा टू कराड अशी शिवज्योत आणण्यात येणार आहे.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर धर्मवीर संभाजी मंडळ कोपर्डे हवेलीचे कार्यकर्ते शिवज्योत आणण्यासाठी आंध्रप्रदेशमध्ये रवाना झाले. या मंडळाचे कार्यकर्ते शिवजयंतीला 39 वर्षांपासून विविध किल्ल्यांवरून शिवज्योत आणतात. यावर्षी आंध्र प्रदेशातील श्रीशैलम छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातून शिवज्योत प्रज्वलित करण्यासाठी गेले आहेत. मंडळाचे कार्यकर्ते सोमवारी रात्री दि. 25 एप्रिल रोजी 12 वाजता कोपर्डे येथून रवाना झाले. त्यानंतर सोमवार 2 मे रोजी ही शिवज्योत कोपर्डे हवेली येथे पोहोचणार आहे.

या शिवज्योतीचा प्रवास महाराष्ट्र- कर्नाटक- तेलंगणा- आंध्र प्रदेश असा चार राज्यातून होणार आहे. शिवज्योत सायकलवरून आणली जाणार असून मंडळाच्या 25 कार्यकर्त्यांचा यामध्ये सहभाग आहे. या ज्योतीचे गावात आगमन झाल्यानंतर वेशीवर स्वागत करण्यात येणार आहे. कोरोनाचा अपवाद वगळता सलग 39 वर्ष शिवज्योत आणण्याचे काम मंडळाचे कार्यकर्ते करत आहेत 2018साली दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून ज्योत आणण्यात आली होती.

Leave a Comment