Wednesday, June 7, 2023

उद्योगपती अनिल अंबानींनी कर्ज फेडण्यासाठी बँकेलाच विकले हेड ऑफिस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : उद्योगपती असूनही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले उद्योगपती अनिल अंबानी यांनी नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी येस बँकेलाच आपले हेड ऑफिस विकले आहे. त्यांनी Reliance infrastructure चे मुंबई येथील मुख्य कार्यालय येस बँकेला 1200 कोटी रुपयांना विकले आहे. कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार या व्यवहारातून आलेल्या पैशांचा अपयोग हा येस बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासठी केला जाईल. यापूर्वी 2020 मधील जुलै महिन्यातच येस बँकेने रिलायंस ईन्फ्राच्या मुख्यालयावर ताबा घेतलेला. त्यानंतर रिलायंस ईन्फ्राने कार्यालय विकल्याची अधिकृतपणे घोषणा आज केली.

अनिल अंबानी यांच्या रिलायंस इंफ्रा कंपनीवर असलेल्या 2,892 कोटी रुपयांच्या वसुलीकरीता बँकेना वित्तीय कारवाई केली होती. कोणत्याही बँकेला एखाद्याच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करायची असेल तर त्याआधी दोन महिने नोटीस द्यावी लागते. ही प्रक्रिया बँकेने याआधीच पार पडली होती. त्यानंतर दबाव वाढल्यामुळे अधिकृतपणे अंबानी यांच्या कंपनीने मुख्य कार्यालय विकल्याचे जाहीर केले.

मुकेश अंबानी यांचे भाऊ अनिल अंबानी यांच्या रिलायंस इन्फ्राटेल या कंपनीवर वेगवेगळ्या बँकेचे एकूण 3515 कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कर्जाची इन्फ्राटेलला परतफेड करायची आहे. त्यासाठी अनिल अंबानी यांनी मुकेश अंबानी यांची बऱ्याच प्रमाणात मदत झाली होती. त्यासाठी NCLT ने रिलायंस इन्फ्राटेल या अनिल अंबानी यांच्या कंपनीसाठी एक रिजॉल्यूशन प्लॅन तयार केला होता. या योजनेंतर्गत मुकेश अंबानी यांच्या जिओने रिलायंस इन्फ्राचे जवळपास 4400 कोटी रुपयांचे असेट्स खरेदी केले होते. 2020 च्या डिसेंबर महिन्यात हा व्यवहार झाला होता. हा व्यवहार झाल्यानंतर रिलायंस इन्फ्रा या कंपनीचे टेलिकॉम टॉवर आणि फायबर असेट्स जिओ कंपनीला मिळाले होते.