व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आदित्यजी लवकर तुमचे शुभमंगल होवो आणि सीतामाईसारखी सूनबाई आम्हाला मिळो; भाजप नेत्याने दिल्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी इस्कॉन मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. त्याच्या या दौऱ्यास भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्री आदित्य यांचे लवकर शुभमंगल होवो आणि सीतामाईसारखी सून आम्हाला मिळो, असे बोंडे यांनी म्हंटले आहे.

महाराष्ट्रातील युवा राजकारणी आणि पर्यावरणमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांना ओळखले जाते. शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र म्हणूनही आदित्य याची ओळख आहे. आदित्य ठाकरे यांचे अद्यापही लग्न झालेले नसल्याने यावरून आज भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी एक विधान केले. यावेळी ते म्हणाले की, ही अतिशय चांगली गोष्ट आहे की आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन श्रीकृष्ण आणि राधाचे दर्शन घेतले आहे. ते श्रीराम आणि सीतामाईचेही दर्शन घेतील. आमच्या त्यांच्या दौऱ्यास शुभेच्छा आहेत. मी ज्यावेळी सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गेलो होतो, त्यावेळी सीतामाई सारखी सूनबाई आम्हाला मिळो आदित्याजींचं लवकर शुभमंगल होवो अशी इच्छा व्यक्त केली असल्याचे बोंडे यांनी म्हंटले

दरम्यान, अयोध्या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अयोध्येत रामलल्लाचे दर्शनासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. त्यांच्या सोयी-सुविधेसाठी या ठिकाणी एक महाराष्ट्र सदन उभारण्यात येणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. दरम्यान आज भाजपच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार बोंडे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.