BREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारागृहात असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Get Bail) यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. एक लाख रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अनिल देशमुख यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र ईडीच्या खटल्यात जामीन मिळाला असला तरी देशमुख यांच्यावर सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याचीही नोंद आहे. त्यामुळे देशमुख यांना सीबीआय च्या खटल्यात बेल मिळालेली असली तरी त्यांना सीबीआयच्या खटल्यातील सुनावणी होई पर्यंत तुरूंगात राहावे लागणार आहे.

दरम्यान, देशमुख यांचा जामीन अर्ज जवळपास सात महिन्यांपासून प्रलंबित राहिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयाला लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करून निर्णय देण्याचे निर्देश दिले होते.