मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. यानंतर विरोधी पक्षाने सरकारवर सडकून टीका केली आहे. यावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
सुरक्षा समितीचा अहवाल आल्यानंतरच आपण सदर निर्णय घेतला असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले आहे. यानंतर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही फोन आला. माझीही सुरक्षा कपात करा. मला इतक्या सुरक्षेची गरज नाही असं पवार यांनी मला सांगितलं असंही देशमुख यांनी म्हटले आहे. भाजपची सत्ता असताना शरद पवांरांसारख्या राष्ट्रीय नेत्यालाही सुरक्षा नव्हती असं देशमुख म्हणले.
दरम्यान, राज्यातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. याबाबत नुकताच महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील झेड सिक्युरिटी काढण्यात आली असून आता त्यांना वाय प्लस (y+) सुरक्षा देण्यात येणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’