सडावाघापूर पठारावर विषबाधेमुळे आठ जनावरांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सडावाघापूर पठारावरील माऊली मंदीर परिसरात उघड्यावर टाकलेले शिजविलेले शिळे अन्न (भात) खाल्ल्याने 5 शेतकऱ्यांच्या 4 गाभण म्हैशी व 3 गाभण गायींचा मृत्यू झाल्याने पठारावर एकच खळबळ माजली आहे.

तर आणखी 4 म्हैशींची प्रकृती पूर्णपणे खालावली असल्याने त्यांच्यावरही पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे पशुधन नष्ट झाल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा प्रकारे उघड्यावर अन्न टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही सडावाघापूर पठारावरील शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पशुधन नष्ट झाल्याने ऐन पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. अशा प्रकारे उघड्यावर अन्न टाकण्यास निर्बंध घालून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Leave a Comment