Wednesday, February 8, 2023

प्राणीप्रेम : चक्क रुबी नावाच्या डॉगीचा अनोखा ओटीभरण समारंभ, पहा Video

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

माणसांसाठी तर समारंभ भरपूर होतात पण साताऱ्यातील जिल्ह्यातील फलटण शहरातील एका कुटुंबाने मुलीप्रमाणे सांभाळलेल्या रुबी नावाच्या डॉगीचा अनोखा ओटीभरण समारंभ साजरा केला आहे. या ओटीभरण कार्यक्रमांची चांगलीच चर्चा लोकांच्यात पहायला मिळत आहे. कार्यक्रमात उपस्थितांना झाडाचे रोप देवून वृक्षप्रेम तर एका कुत्र्याचे ओटीभरण करून प्राणीप्रेम जपले आहे.

- Advertisement -

फलटण शहरातील जाधववाडी येथील विनोद मरूडा यांच्या कुटुंबाने त्यांच्या घरी असलेल्या 3 वर्ष वयाच्या रुबी डॉगीचा ओटीभरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमासाठी जाधववाडी परिसरातील मोजक्या महिलाना निमंत्रण देण्यात आले होते. कुटुंबातील एखाद्या महिलेचा ओटीभरण कार्यक्रम ज्याप्रमाणे पार पाडला जातो. त्यापद्धतीने या रुबी डॉगीला सजविण्यात आले होते. यावेळी रुबिसाठी पाळणा ही आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला होता.

विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेला झाडाचे एक रोप देऊन वृक्षसंवर्धनाचा चांगला संदेश मरुडा कुटुंबाने दिला आहे. हा कार्यक्रम जरी छोटा असला तरी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन यावेळी करण्यात आले होते. मरुडा कुटुंबाने एकाद्या घरातल्या सदस्याप्रमाणे या प्राण्याचे अनोखे ओटीभरण केल्यामुळे या परिसरात रुबी या डॉगीचा चांगलाच विषय रंगलेला आहे.