हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता हि भेट झाली असून दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. दरम्यान या भेटीनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खोचक मत व्यक्त केले.
15 जुलै फडणवीस आणि भुजबळ भेटतात ( घेऊन?) 16 जुलै फडणवीस दिल्ली ला जातात . 17 जुलै शरद पवार दिल्लीला जाऊन मोदींना भेटतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही असे ट्विट अंजली दमानिया यांनी केलं आहे.
15 जुलै फडणवीस आणि भुजबळ भेटतात (निरोप घेऊन?)
16 जुलै फडणवीस दिल्ली ला जातात
17 जुलै शरद पवार दिल्लीला जाऊन मोदींना भेटतात.
महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही— Mrs Anjali Damania (@anjali_damania) July 17, 2021
दरम्यान, देशातील नागरी बँका आणि सहकारी बँकांवर निर्बंध आणण्याचं काम रिझर्व्ह बँकेनं केलं आहे. ते बंधन करणी करावेत यासाठी शरद पवार दिल्लीत भेटीला गेल्याचं जयंत पाटील यांनी म्हंटल. “देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रातल्या लोकांनी गेल्या महिन्या-दीड महिन्यात अनेक पत्र पाठवली. त्या सगळ्यांचा विचार करून केंद्र सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत, यासाठी शरद पवार त्यांना भेटायला गेले”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.