अण्णा हजारेंचा एसटी संपाला पाठिंबा; कर्मचाऱ्यांना दिला ‘हा’ कानमंत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असून कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. याच पार्श्वभूमीवर . या संदर्भात एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

कोणतेही सरकार फक्त आंदोलनाला घाबरत नाही तर, ते पडण्याला घाबरते आंदोलनांच्या माध्यमातून जनमताचा रेटा तयार केल्यास त्याला घाबरून सरकार जनतेच्या मागण्या मान्य करते. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येत राज्य सरकारवर दबावशक्ती निर्माण करावी, मात्र कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन शांततेच्या आणि असंहिसेच्या मार्गाने केले पाहिजे. कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेची यामध्ये हानी होता कामा नये, असेही हजारे यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात एस टी कामगारांचा संप सुरू असून कर्मचाऱ्यांच्या जवळपास सर्वच संघटना यामध्ये सहभागी झाल्याने एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. राज्यातील विरोध पक्ष भारतीय जनता पक्षाने संपाला पाठिंबा देत त्यामध्ये सहभागही घेतला आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांना देखील पाठिंबा मिळाला असून संप अजून चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Comment