Saturday, March 25, 2023

पीएम किसान योजनेची नवी यादी जाहीर 

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। पीएम किसान योजनेची नवी यादी सरकारद्वारे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यनिहाय लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या जाहीर करण्यात आली आहे. अगदी सहज या यादीत आपले नाव शोधता येणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही अत्यंत लोकप्रिय योजना आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक रोख रकमेच्या रूपात लाभ देणे हा या योजनेचा हेतू आहे. बऱ्याच राज्यातील शेतकरी याचा लाभ घेत आहेत. या योजनेची सुरुवात उत्तरप्रदेश मधून झाली होती. आता देशभरातील शेतकरी याचा लाभ घेत आहेत. पश्चिम बंगाल मात्र या योजनेचा लाभ घेण्यामध्ये मागे असल्याचे दिसून येते आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान, कर्नाटक आणि तामिळनाडु राज्यात मोठ्या प्रमाणात याचा लाभ घेतला जातो आहे. अधिकृत माहितीनुसार ८ जून पर्यंत देशातील ९ कोटी ८३ लाख शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

उत्तर प्रदेश (22603619) मध्य प्रदेश (7152643) हरियाणा (1678267) आसाम (3111250) गुजरात (5329394) उत्तराखंड (779154) बिहार (6677343) हिमाचल प्रदेश (893197) कर्नाटक (5138119) छत्तीसगड (2427910) केरळ (3067712) राजस्थान (6463353) महाराष्ट्र (9964421) पंजाब (2342427) ओडिसा (3694751) तामिळनाडू (4049364) तेलंगाना (3659658) झारखंड (1747745) अशी राज्यनिहाय लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे.

- Advertisement -

या यादीत आपले नाव तपासण्यासाठी  pmkisan.gov.in  या वेबसाईटवर जावे लागेल इथे यादी जाहीर झाली आहे.  वेबसाईटवर फार्मर कॉर्नर पर्यायावर जाऊन आधार अथवा मोबाईल नंबरवरून आपले नाव तपासता येते. तुमचा नंबर चुकीचा असेल तर ती माहितीही तुम्हाला इथे मिळते. आपल्या नावासहित जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर शेतकरी आधार संख्या/बँक खाते/मोबाईल नंबर याद्वारे अर्जाची माहिती मिळविता येते. फॉर्मर कॉर्नर वर जाऊन लाभार्थी सूची यावर क्लिक करून आपले राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक आणि गाव टाकून अगदी सहज Get Report वर क्लिक करून आपण यादी मिळवू शकता.