मनपा निवडणूकीच्या तोंडावर एमआयएमला आणखी एक ‘झटका’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – एमआयएमने औरंगाबाद मनपाच्या 2015 मधील निवडणुकीत 115 पैकी तब्बल 24 जागा मिळवून, शहरातीलच नव्हे तर राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण केले होते. परंतु, आता या वादळाची तीव्रता कमी होत चालल्याचे प्रचिती येत आहे. अलीकडेच एमआयएम पक्षातील दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्या पाठोपाठ आता रोशन गेट वॉर्डाच्या माजी नगरसेविका साजेदा सईद फारूकी यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीच्या तोंडावर मला मोठा झटका लागला असल्याची चर्चा शहरात सध्या सुरू आहे.

मराठवाड्यात सर्वप्रथम नांदेड शहरात एमआयमनी एन्ट्री मारली. नांदेड मधील 2011 च्या पहिल्या मनपा निवडणुकीत तब्बल 11 नगरसेवक निवडून आणत मराठवाड्याच्या राजकारणात दिमाखदार एंट्री केली होती‌. परंतु 2016 मधील पुढच्याच मनपा निवडणुकीत या पक्षाचा नांदेडात सफाया झाला त्याचीच प्रचिती आता औरंगाबाद शहरात आल्यास आश्चर्य वाटायला नको. औरंगाबाद महापालिकेचा कार्यकाळ एप्रिल 2020 मध्ये संपला, त्यानंतर महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. मनपा निवडणुका कधी होतील हे निश्चित नाही. मात्र त्यापूर्वी एम आय एमआयएमला चांगलेच झटके लागत आहे. सर्वात आधी आसेफिया कॉलनी येथील सय्यद मतीन, बायजीपुरा भागातील शेख जफर यांनी एमआयएम मधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

त्यातच आता रोशन गेट भागातून एमआयएमच्या तिकीटावर निवडून आलेल्या साजिदा सईद फारूकी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, अभिषेक देशमुख, शेरखान, शिवाजीराव गरजे यांची उपस्थिती होती. एमआयएम पक्षाच्या माजी नगरसेवकांची संख्या 24 वरून थेट 21 वर गेली असून, आणखीनही काही नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Leave a Comment