अनुस्कुरा घाटात पुन्हा दरड कोसळल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राजापूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. राज्यात ठिकठिकाणी नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. कोकणामध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली (crack fell) आहे. यामुळे घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आज पहाटे पाचच्या सुमारास अनुस्कुरा घाटात पुन्हा एकदा दरड (crack fell) कोसळली. या दुर्घटनेमुळे रत्नागिरीवरून राजापूर- कोल्हापूर मार्गे पुण्याला जाणारी एसटी घाटात अडकली. या दुर्घटनेमुळे जड वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दुचाकी काही प्रमाणात पास होत आहेत मात्र मोठ्या गाड्या मात्र घाटात अडकल्या आहेत. त्यामुळे घाटात मोठ्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.दरड (crack fell) कोसळण्याची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दरड (crack fell) हटवण्याचे काम सुरु केले आहे.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातला परशुराम घाट दरड (crack fell) कोसळत असल्याने अत्यंत धोकादायक बनला असल्याने गेल्या महिनाभरापासून या घाटातील वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. हा घाट धोकादायक बनल्याने याचा सर्वाधिक मोठा फटका घाट माथ्यावरील परशुराम आणि घाटाच्या अगदी पायथ्याशी असलेल्या पेढे परशुराम या दोन गावांना बसला आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर

Leave a Comment