Saturday, March 25, 2023

उज्वला ठाणेकर खून प्रकरणात आणखी एक युवक कराड पोलिसाच्या ताब्यात

- Advertisement -

कराड | शहरातील वाखाण परिसरातील उज्वला ठाणेकर हिच्या खून प्रकरणात आणखी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात उज्वलाची बहिण ज्योती निगडे मुख्य सुत्रधार आहे. तीच्या सोबत तिचा प्रियकर सागर पवार खून करण्यासाठी होता. दोघांना अटक झाल्यानंतर उज्वलाचे ज्योतीचा नवरा सचिन निगडे यांच्याशी अनैतिक संबध होते. त्या रागातून ज्येतीसह सागरने उज्वलाचा काटा काढल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्याच तपासातील दुसरा धागा उलगडताना पोलिसांना महत्वाची माहिती हाती लागली आहे. त्यानुसार आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे कसून तपास सुरू आहे.

उज्वलाची बहिण ज्योती हीच सुत्रधार असल्याने या प्रकरणात खळबळ उडाली आहे. ज्योतीने तिचा प्रियकर सागर याच्यासोबत खूनाचा कट रचून तो यशस्वी केला. त्यावेळी त्यांनी हातमोजे वापरल्याचेही पोलिस तपासात समोर आले. ज्येतीचा नवरा सचिन निगडे खून प्रकरणात फिर्यादी आहे. त्यामुळे पोलिसही चक्रावले आहे. सचिन निगडेची बायको ज्योती व तिचा प्रियकर सागर यांनी अत्यंत हुशारीने घरामागील बाजूच्या शेतातील रस्त्याने उज्वला हीच्या वाखाणमधील घरात शिरून तिचा खून करून काटा काढाला आहे. पोलिसांना ते तपासात समोर आणले.

- Advertisement -

संशयित दोघांना घरात शिरल्याचे व तेथून पलायन केल्याचा मार्गही पोलिसांनी तपासवेळी पंचासमक्ष दोघांकडून कबूल केला आहे. घराबाहेर रक्ताच्या ठशाचा पायही दोघापैकी एकाचा आहे, त्याची खात्री पोलिस करत आहेत. तोपर्यंत पुन्हा या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. त्यात आणखी एका युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे कसून तपास सुरू आहे. त्याने त्या दोघांना शस्त्र पुरवले आहे का, त्या दोघांना पळून जाण्यासह त्यांना आश्रय देण्याचे कामही केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यानुसार त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.