स्थलांतरित कामगारांसाठीच्या सरकारी उपाययोजनांवर अनुभव सिन्हा नाराज, म्हणतात..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संचारबंदीच्या बऱ्याच कालावधीनंतर भारतीय सरकारने श्रमिक रेल्वेची व्यवस्था करून कामगारांच्या घरी परतण्याची सोय केली आहे. देशातील विविध राज्यातील स्थलांतरित कामगारांमध्ये आपापल्या घरी नीट पोहोचण्याची आशा निर्माण झाली आहे. सरकारचे आपल्याकडे उशिरा का असेना पण लक्ष गेले आहे याचे काही प्रमाणात समाधान त्यांच्यामध्ये दिसून येते आहे. पण या सुविधा कितपत कामगारांपर्यंत पोहोचत आहेत हा एक मोठा आणि रहस्यमय प्रश्न आहे.

एकीकडे कामगारांनी भरलेल्या रेल्वेचे फोटो आहेत तर एकीकडे अजूनही पायपीट करणाऱ्या मजुरांना होणाऱ्या मारहाणीचे व्हिडीओ आहेत. एकीकडे रेल्वे बुकिंगसाठी हजारोंच्या संख्येने जमा झालेले कामगार आहेत तर दुसरीकडे आमच्यासारख्या कामगारांच्या मृत्यूंचे फोटो आदरणीय पंतप्रधानांपर्यंत पोहोचत आहेत का? असे प्रश्न विचारणारे आणि रस्त्यावर सरकारच्या मदतीची वाट बघणारे कामगार आहेत. कामगारांमध्ये सरकारची इतकी दहशत निर्माण झाली आहे की, आता ते आपल्या गावी परतायलाही घाबरत आहेत. 

संचारबंदीच्या या काळात या स्थलांतरित कामगारांना दिलासा देण्यासाठी आतापर्यंत कितीवेळा आपल्या आदरणीय मंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे? आपले कामगार मंत्री कोण आहेत? आपले आरोग्य मंत्री शेवटी केव्हा पत्रकार परिषदेत बोलले होते. असे अनेक प्रश्न चित्रपट निर्माते अनुभव सिन्हा सातत्याने आपल्या ट्विटर हॅन्डल वरून विचारत आहेत. पर्यायाने काही मार्मिक टोलेही देत आहेत. भारत सरकारच्या इतर मंत्र्यांनी केवळ एकाच माणसावर सर्व काम न सोपवता थोडे काम स्वतःही केले पाहिजे आणि पंतप्रधानांच्या डोक्यावरचे ओझे थोडे हलके केले पाहिजे असे ट्विट त्यांनी केले आहे. त्यात ते म्हणतात की दूरदर्शनवरील घोषणांसहित सर्व कामे एकाच माणसाने करणे अन्यायकारक आहे. 

सरकारच्या उपाययोजना घोषित होऊनही कशा पद्धतीने कामगार असहाय होत आहेत आणि निराशेला बळी पडत आहेत. याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनुभव सिन्हा हे जाणते सिनेमा निर्माते आहेत. तसेच विविध घटनांवर ते सातत्याने आपल्या ट्विटर अकॉउंट वरून व्यक्त होत असतात.

Leave a Comment