महत्त्वाची बातमी! हज यात्रेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; ही असेल अंतिम तारीख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दरवर्षी हजारो मुस्लिम बांधव  हज यात्रा करण्यासाठी सौदी अरेबियातील मक्का येथे जात असतात. त्यामुळे  4 डिसेंबरपासूनच हज 2024 यात्रेसाठी कमिटी ऑफ इंडिया, मुंबईच्या संकेतस्थळ ऑनलाइन बुकिंग सेवा सुरू झाली आहे. ज्या व्यक्तींना हज यात्रेला जायचे आहे ते व्यक्ती 20 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. मुख्य म्हणजे, अर्ज भरताना अर्जदारांनी मार्गदर्शक तत्त्वे आणि घोषणा वाचणे आवश्यक आहे.

हर्ष यात्रेसाठीचे ऑनलाइन अर्ज सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी वेबसाईटवर काही तांत्रिक अडचणी येऊ लागल्या होत्या. मात्र आता हज कमिटी ऑफ इंडियाच्या http://hajcommittee.gov.in या संकेतस्थळावर किंवा हज सुविधा मोबाइल अॅपवरून अर्ज करता येऊ शकतात. या अर्जासाठी पासपोर्ट, पासपोर्ट साईज रंगीत छायाचित्र, बँक पासबुक किंवा रद्द केलेले चेक, आधारकार्ड, पॅनकार्ड, रक्तगटाचे माहिती, कोविड वॅक्सीन प्रमाणपत्र अशी सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत.

दरम्यान, हज यात्रेबाबत सूचना सचिव/कार्यकारी अधिकारी उत्तर प्रदेश राज्य हज समितीने जारी केल्या आहेत. जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकारी झहीर अब्बास म्हणाले की, हज 2024 यात्रेसाठी ऑनलाइन अर्ज 4 डिसेंबरपासून हज कमिटी ऑफ इंडिया, मुंबईच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅप हज सुविधावर सुरू झाले आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवरील माहिती तपासावी.