Fact Check: खरंच उत्पादन शुल्क विभागात होणार आहेत 70,000 लोकांची भरती? बातमी मागील सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्पादन शुल्क विभाग सर्व राज्यात 70,000 हून अधिक भरती करणार असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअॅपवर ही बातमी खूप वेगाने व्हायरल होते आहे. या वृत्तानुसार, सरकारला कराच्या स्वरूपात सर्वाधिक उत्पन्न मिळते आणि जास्तीत जास्त उत्पादन शुल्क हे उत्पादन शुल्क विभागाचे आहे. आणि सध्या शासनाने 50% हून अधिक दुकानांना परवानगी दिली आहे. ज्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने सर्व राज्यांत 70 हजाराहून अधिक भरती होणार असल्याचे म्हंटले आहे. चला तर मग जाणून घेऊया या वृत्ताचे सत्य काय आहे …

खर्च इतक्या भरती होणार आहेत? सत्य जाणून घ्या
या बातमीचे परीक्षण केल्यावर ही बातमी बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यासंदर्भात अशी कोणतीही बातमी कोणत्याही वेबसाइटवर प्रसिद्ध केलेली नाही. हा दावा खोटा असल्याचे PIB नेदेखील स्पष्ट केले आहे. सरकारने अशी कोणतीही भरती होणार असल्याचे जाहीर केलेले नाही.

या बातमीत एक अधिसूचनाही जोडली गेली आहे, ज्यात म्हटले आहे की आर्थिक वर्ष 2019 आणि 2020 नंतर देशी दारू, विदेशी दारू, बिअरच्या किरकोळ दुकाने व मॉडेलच्या दुकानांच्या नवीन नोंदणीसाठी ही प्रक्रिया सुरु केली गेली आहे. ज्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like