ITR न भरल्यामुळे तुम्ही जास्त TDS भरत आहात का? तर ‘या’ संकटातून कसे बाहेर पडावे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरला असेल मात्र तुम्हाला दुप्पट TDS भरावा लागत असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. वास्तविक, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 21 जून, 2021 रोजी एक परिपत्रक जारी केले आहे, ज्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे की, जर एखाद्या व्यक्तीने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी ITR दाखल केले तर त्याचे नाव लिस्टमधून काढून टाकले जाईल आणि उच्च TDS / TCS त्याला यापुढे लागू होणार नाही.

जर एखाद्या करदात्याने गेल्या 2 वर्षात TDS दाखल केला नसेल आणि प्रत्येक वर्षी TDS ची कपात 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर ITR दाखल करताना इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जास्त शुल्क आकारत आहे. 1 जुलैपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार, ज्यांनी ITR दाखल केला नाही त्यांच्यासाठी TDS आणि TCS चे दर 1 जुलैपासून 10 ते 20 टक्के असतील, पूर्वी ते 5 ते 10 टक्के होते.

लिस्टमधून नाव कसे काढायचे?
ज्या व्यक्तीवर जास्त TDS लागू आहे अशा विशिष्ट व्यक्तींच्या लिस्टमधून एखादी व्यक्ती त्याचे नाव काढून टाकू शकते का? होय, अशी व्यक्ती लिस्ट मधून त्याचे नाव काढून टाकू शकते आणि उर्वरित आर्थिक वर्षासाठी जास्त TDS / TCS टाळू शकते. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी ITR दाखल करून हे करता येते. परिपत्रकानुसार, “जर कोणत्याही निर्दिष्ट व्यक्तीने मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी उत्पन्नाचा वैध रिटर्न दाखल केला (फाइल आणि सत्यापित), तर त्याचे नाव निर्दिष्ट व्यक्तींच्या लिस्टमधून काढून टाकले जाईल. हे दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेला केले जाईल. मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी उत्पन्न किंवा वैध रिटर्न (फाइल आणि पडताळणी) वास्तविक दाखल करण्याच्या तारखेनंतर हटवले जाईल.

ITR भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे
आर्थिक वर्ष 2020-21 साठी ITR भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. तज्ज्ञांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला दोन आर्थिक वर्षांनंतर, केवळ ITR भरल्यानंतर आणि व्हेरिफाय केल्यानंतर किंवा संपुष्टात आल्यानंतरच निर्दिष्ट लिस्टमधून वगळण्यात येईल. तर अशा प्रकारे एकदा आपण 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आपला ITR दाखल केला की त्याचे व्हेरिफिकेशन करा. जर तुम्ही त्या वेळेपर्यंत तुमचा ITR भरला आणि व्हेरिफाय केला असेल तर तुमचे नाव 30 सप्टेंबर 2021 नंतर हटवले जाईल.