हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या अभिनयापेक्षा वैयक्तिक वा खाजगी आयुष्यातील बाबींमुळे चांगलाच चर्चेत असतो. त्याच्या चित्रपट कारकीर्दीत अद्याप तो काही फारसा उठून आलेला नाही. आजकाल अर्जुन कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. अर्जुनचे त्याच्या आईवर प्रचंड प्रेम होते. तो नेहमीच त्याच्या इंस्टाग्राम वर आपल्या आईचे फोटो शेअर करीत असतो. नुकताच जागतिक मातृदीन पार पडला. त्याच्या अगदी दुसऱ्या दिवशीच अर्जुन कपूरने त्याच्या आई सोबतचा एक थ्रोबॅक फोटो पोस्ट करीत अत्यंत भावनिक कॅप्शन लिहलं होतं. या कॅप्शनमध्ये त्याने मदर्स डे विषयी तिरस्कार व्यक्त केला आहे. त्याची हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच वायरल होतेय.
अभिनेता अर्जुन कपूरने हि पोस्ट इंस्टाग्रामवर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिताना अर्जुन कपूरने लिहिले आहे कि, “काल मदर्स डे होता मला त्या गोष्टीचा,दिवसाचा अगदीच तिरस्कार आहे .. उद्या मला अभिनेता म्हणून ९ वर्षे झाली. पण आजही मी तुझ्याशिवाय हरवलो आहे. या फोटोमध्ये तू मला जसे पाहत आहेस, आशा आहे की तू आत्ताही माझ्याकडे अशीच पाहत आहेस आणि माझ्या पाठीवरून हात फिरवत आहेस. अश्या भावनिक आशयाची हि पोस्ट चाहत्यांच्या मनाला चांगलीच भिडली आहे.
अभिनेता अर्जुन कपूरच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच त्याची आई मोना कपूर यांचे निधन झाले होते. अर्जुन कपुरने २०१२ मध्ये ‘इशकजादे’ या चित्रपटामधून बॉलिवुड मध्ये एन्ट्री केली होती. या चित्रपटात तो अभिनेत्री परिणीती चोप्रासाह दिसला होता. त्याच्या वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास अर्जुन लवकरच रकुल प्रीत सिंगसोबत नेटफ्लिसचा आगामी चित्रपट ‘सरदार का ग्रँड सन’ मध्ये दिसणार आहे. तसेच मलायका अरोरा सोबतच्या नातेसंबंधांबाबत उठणाऱ्या चर्चांमुळे अर्जुन सातत्याने ट्रोलिंगचा शिकार होताना दिसतो.