अबुजा : पॅराजम्पचे (parachutes) अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्याचे आपण पाहिलेच असतील. अशाच पद्धतीचा पॅराजम्पचा (parachutes) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहताच पायाखालची जमीन सरकल्या शिवाय राहणार नाही हे मात्र नक्की.
Nigerian paratroopers practicing for the Nigerian Independence Day celebrations in Abuja didn’t end very well. #Nigeria https://t.co/hgndLCJvE0
— CNW (@ConflictsW) September 29, 2022
हा संपूर्ण व्हिडिओ नायजेरियातील असल्याचे समोर आले आहे. नायजेरियाचा 1 ऑक्टोबरला स्वतंत्र दिन आहे. त्याचा अनुषंगाने नायजेरियाच्या जवानांची कसरतीचा सराव सुरू होता. जवानांची एक टीम सराव करत होती. पण जेव्हा जवान विमानातून बाहेर आले त्यांच्या लक्षात आले की पॅराशूट (parachutes) हे फाटलेले आहे.
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो फाटलेल्या पॅराशूट (parachutes) सह काही जवान आकाशातून जमिनीच्या दिशेने येताना दिसत आहेत. या संपूर्ण घटनेमुळे पॅराशूट आधीपासूनच फाटलेले होते की उडी मारल्यानंतर फाटले याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. जवान जेव्हा आकाशातून जमिनीवर येतात तेव्हा त्यांना जिथे लँड करायचे होते तिथे लँड करता नाही आले आणि सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी पडले. कोणी झाडावर तर कोणी रस्त्या शेजारी पार्क असलेल्या गाड्यांवर तर कोणी रस्त्यांवर पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय