पाचोरा तालुक्यातील जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द गावातील जवानाची कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडलीय. पश्चिम बंगाल राज्यातील हाजीपूर वैशाली येथील हा प्रकार घडलाय. आत्महत्येचे कारण अजून समजू शकलेले नसून मानसिक ताणातून हे कृत्य केले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ईश्वर गिरधर चौधरी (वय ३३) असे आत्महत्या करणाऱ्या जवानाचे नाव असून ही घटना रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पश्चिम बंगाल राज्यातील हाजीपूर वैशाली येथे घडलीय. या प्रकारामुळे गावात शोककळा पसरली आहे.

ईश्वर चौधरी हे सशस्त्र सीमा बलमध्ये जुलै २०११ मध्ये भरती झाले होते. सध्या त्यांची नेमणूक सशस्त्र सीमा बलच्या ६५ बटालियनमध्ये बिहार राज्यात होती. त्यांनी स्वतःच्या ताब्यात असलेल्या रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ईश्वर यांनी आत्महत्या केल्याची माहिती निरीक्षक गार्ड शंभुनाथ बारमन यांनी वरिष्ठांना कळवली. त्यानंतर या घटनेची माहिती ईश्वरच्या कुटुंबियांना देण्यात आली. दरम्यान, ईश्वरच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. ईश्वर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, २ मुले, मोठा भाऊ असा परिवार आहे. त्यांचे मोठे भाऊ देखील सैन्यात निवृत्त जवान आहेत.

Leave a Comment