Sunday, April 2, 2023

मेक्सिकोमध्ये रक्तरंजित गॅंगवॉरनंतर, रस्त्यावर सापडले मृतदेहाचे ढीग

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मेक्सिकोमध्ये संघटित गुन्हेगारी हिंसाचाराचे धक्कादायक आणि क्रौर्य रूप समोर आले असून तेथे पोलिसांना 2 राज्यात सुमारे 30 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. या देशात गॅंगवॉरमध्ये बर्‍याच लोकांचा बळी जातो, मात्र ही संख्या सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी आहे. जाकाटेकस टेकसच्या फ्रेसनिलो शहरात 14 लोकांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेले आढळले. याखेरीज दुसर्‍या एका राज्यात आणखी 16 मृतदेह सापडले, त्यातील बरेच मृतदेह हे एका छोट्या ट्रकमध्ये पडले होते.

‘मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळले जातात’
दरम्यान, बंदूकधारकांनी मेक्सिको सिटी पोलिस प्रमुखांच्या चिलखती वाहनावर हल्ला केला. मेक्सिको शहर पोलिस प्रमुख उमर गारसिया हरफुच यांच्यावर 24 बंदूकधार्‍यांनी 50 कॅलिबर स्नायपर रायफल आणि ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यात हरफुच जखमी झाले. यादरम्यान त्याचे दोन सुरक्षा कर्मचारी आणि तेथून जाणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला. जाकाटेकस पोलिसांनी रस्त्यावर पडलेल्या मृतदेहांविषयी सविस्तर माहिती दिली नाही, मात्र छायाचित्रांमध्ये ते मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळले आणि टेपने बांधलेले दिसून आले.

- Advertisement -

एका छोट्या ट्रकमध्ये 7 मृतदेह सापडले
यापूर्वी सिनालोआ राज्यातील कुल्याकन शहरातील ग्रामीण भागाजवळ एका छोट्या ट्रकमध्ये सैनिकी गणवेश परिधान केलेल्या 7 जणांचे मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. जवळच असलेल्या इतर भागातही पोलिसांना 9 लोकांचे मृतदेह सापडले, त्यापैकी किमान एका मृतदेहा जवळ एक रायफल मिळाली आहे. राज्य पोलिस प्रमुख क्रिस्टोबाल कास्टेनेडा म्हणाले, “हे प्रकरण स्पष्टपणे दोन संघटित गटातील परिसरातील वर्चस्वाच्या संघर्षाचे आहे.” गेल्याच महिन्यात येथून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रे जप्त केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.