Wednesday, October 5, 2022

Buy now

टीचरला अटक करा, थेट दुसरीतल्या विद्यार्थ्याने घेतली पोलीस ठाण्यात धाव अन्….

हैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबाद मध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. यामध्ये एका दुसरीच्या विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकाच्या विरोधात तक्रार नोंदवण्याची विनंती पोलिसांना केली. त्याचे कारण ऐकून महिला पोलीस निरीक्षक सुद्धा सुन्न झाल्या. हि घटना तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यातील बयाराम मंडल या परिसरात घडली आहे. अनिल नाईक असे या तक्रार दाखल करणाऱ्या मुलाचे नाव आहे. तो एका खासगी शाळेत शिकतो.

एक दुसरीच्या वर्गात शिकणारा मुलगा अचानक पोलीस ठाण्यात आला. त्याला एकट्याला पाहून तो हरवला असेल असे पोलिसांना वाटले. यानंतर महिला पोलीस निरीक्षक रमादेवी यांनी तू इथं का आलास? असे या मुलाला विचारले. यानंतर त्या लहान मुलाने दिलेले उत्तर ऐकून रमादेवी थक्क झाल्या. मला माझ्या शिक्षकाने मारहाण केली आहे. त्यामुळे मला माझ्या शिक्षकांच्या विरोधात तक्रार नोंदवायची आहे, असं त्या मुलानं सांगितलं.

यानंतर पोलीस निरीक्षक रमादेवी यांनी त्याला कारण विचारलं असता, मी अभ्यास करत नव्हतो म्हणून मारलं, असं त्या मुलानं सांगितले. यावेळी रमादेवी यांनी या मुलाची तक्रार शांतपणे ऐकून घेतली आणि त्यानंतर ते मुलाला घेऊन शाळेत पोहोचल्या. त्या ठिकाणी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थी तडजोड करण्यास तयार नव्हता. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचे समुपदेशन करण्यात आले आणि हा वाद मिटवण्यात आला.