Friday, January 27, 2023

खुल्या बाजारात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेली विदेशी दारू विक्री करण्याऱ्यांना अटक; लाखोंची विदेशी दारू जप्त

- Advertisement -

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्यात खुल्या बाजारात विक्री करिता प्रतिबंधित असलेल्या तसेच फॉर सेल डिफेन्स ओन्ली असे शिक्के असलेला तब्बल 2 लाख 19 हजार 610 रुपयांचा विदेशी दारूचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला आहे. ही कारवाई कडेगाव येथील फिरदोस गार्डन परिसरात करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. रमेश सुखदेव म्हैसमाळे (37) आणि पवन भरत धोटे (33) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पडेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर लष्करातून सेवानिवृत्त झालेले जवान अधिकारी राहतात. जे लष्करातील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, त्यांचे कार्ड जमा करून त्यांच्या नावावर दर महिन्याला महागड्या दारूच्या बाटल्या कमी किमतीत विकत घेत, ड्रायडे किंवा इतर वेळेला चढ्या भावाने विक्री केली जात होती. हा प्रकार पडेगावातील फिरदोस गार्डन भागात होत असल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाच्या पथकाला मिळाली. यावरून पथक प्रमुख निरीक्षक हे जे कुरेशी यांनी फिरदोस गार्डन येथील पवन धोटे यांच्या घरावर छापा मारला.

- Advertisement -

त्यावेळी टीचर्स हायलांड क्रीम स्कॉच व्हिस्की, 100 पायपर, व्हॅट 69, ब्लॅक डॉग, ब्लॅक अँड व्हाईट यासह अनेक महागड्या दारुचा तब्बल 2 लाख 19 हजार 610 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक ए.जे. कुरेशी, दुय्यम निरीक्षक गणेश पवार, भरत दौंड सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश नागरे, आनंत शेंदरकर, जवान अनिल जायभाये, विजय मकरंद, ज्ञानेश्‍वर साबळे, किशोर सुंदरडे यांनी केली आहे.