पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय ; भाजपचा पराभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाची धामधूम सुरु आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना होत आहे. दरम्यान पुणे पदवीधर मतदारसंघात (Pune graduate constituency election) महाविकास आघाडीचे अरुण लाड (Arun Lad) यांचा दणदणीत विजय झाला आहे आहे. अरुण लाड यांनी भाजपच्या संग्राम देशमुख यांचा पराभव केला असून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून मतमोजणी केंद्राबाहेर  जल्लोष सुरु केला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार अरुण लाड यांना अरुण लाड याना तब्बल 122145 मते मिळाली तर संग्राम देशमुख यांना 73321 मते मिळाली त्यामुळे लाड यांचा तब्बल 48 हजार 824 मतांनी दणदणीत विजय झाला. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड , भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यात कांटे की टक्कर होईल असे म्हटले जात होते. परंतु आतापर्यंतच्या निकालांवरुन स्पष्ट झाले आहे की, ही निवडणूक एकतर्फी झाली आहे. दरम्यान महाविकास आघाडीची ही एकी भाजपला मात्र नक्कीच जड जात आहे हे मात्र नक्की

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment