तब्बल ३२ रिक्षा बनावट स्क्रेब प्रकरण झाले उघड; ‘त्या’ अट्टल गुन्हेगाराला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने रिक्षा स्क्रॅप केल्याचा अहवाल सादर करून, फसवणूक केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी 18 जून रोजी आणखी एकाला अटक केली आहे. तपासात तब्बल 32 रिक्षांचे बनावट स्क्रॅप अहवाल आरटीओ कार्यालयात सादर केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीने अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले आहेत याचा तपास अजून सुरू आहे.

शेख कासिम शेख चॉंद (46, रा. संजयनगर, जिन्‍सी) असे आरोपीचे नाव आहे. प्रकरणात आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक रविंद्र नारळे यांनी फिर्याद दिली. त्यानूसार शेख कमरोद्दीन शेख ईस्माईल (रा. रोशनगेट) व त्याच्या साथीदारांविरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला अटकगुन्‍ह्याचा तपासादरम्यान गुन्‍ह्यातील रिक्षा (क्रं. एमएच-२०-बीटी-६४२०) आरोपी मिर्झा बेग आणि रिक्षा मालक शेख कमरोद्दीन यांच्‍या सांगण्‍यावरुन रिक्षाचा बनावट स्क्रॅप अहवाल तयार करण्यात आला. तसेच हा रिक्षा स्क्रॅप झाल्याचे दाखविण्‍यात आले होते.मात्र रिक्षा शेख कासिम याच्‍या ताब्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार पोलिंसानी जिन्‍सी परिसरात आरोपीला बेड्या ठोकल्‍या आणि रिक्षाही जप्‍त केला आहे.आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची पोलिसांची विनंतीआरोपीला शुक्रवारी न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, आरोपीने अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले आहेत? याचा तपास सुरू आहे.

गुन्‍ह्याच्‍या तपासादरम्यान 32 रिक्षांचा बनवाट स्‍क्रॅप अहवाल जप्‍त करण्‍यात आले आहेत. त्‍यापैकी आरोपीच्‍या ताब्यात किती रिक्षा आहेत याचा तपास बाकी आहे. तसेच आरोपी रिक्षा स्‍क्रॅप न करता, त्‍या रिक्षांचा इतर गुन्‍ह्यासाठी वापर करतो का याचाही तपास सुरू आहे. तसेच जप्‍त केलेल्या रिक्षाचा चेसीस व इंजिन क्रमांक आरोपीने बदलला आहे, त्‍याचाही तपास बाकी असल्याने पोलीस कोठडी देण्‍याची विनंती पोलिसांनी केली आहे.

Leave a Comment