हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जगभरात नावाजल्या डाबर इंडियाच्या 3 विदेशी उपकंपन्यांच्या विरोधात अमेरिका आणि कॅनडात सुमारे 5400 खटले दाखल करण्यात आले आहेत. यामुळे डाबर इंडिया कंपनी मोठ्या अडचणीत सापडली आहे. 5400 दाखल आलेल्या खटल्यांमध्ये डाबर इंडियाच्या हेअर -रिलॅक्सर उत्पादनांमुळे गर्भाशयाचा कर्करोग होत असल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. तसेच, हेअर -रिलॅक्सर मुळे आरोग्य समस्या निर्माण झाल्याचा दावा ही करण्यात आला आहे.
शेअर्समध्ये घसरण
अमेरिका आणि कॅनडात डाबर इंडियाच्या ज्या 3 विदेशी उपकंपन्यांविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये नमस्ते लॅबोरेटरीज एलएलसी, डर्मोविवा स्किन एसेंशियल इंक आणि डाबर इंटरनॅशनल लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे. या खटल्यामुळे आता डाबर इंडियाचे शेअर्स देखील घसरले गेले आहेत. आज डाबरचा शेअर 520.05 रुपयांवर व्यवहार करत आहे. ज्याचा तोटा कंपनीला मोठया प्रमाणात बसला आहे. मुख्य म्हणजे, कंपन्यांवर दाखल करण्यात आलेल्या खटल्याची माहिती स्वतः डाबरकडून देण्यात आली आहे.
ज्यामध्ये, डाबरने सांगितले आहे की, नमस्ते, डर्मोविवा आणि डीआयएनटीएल कंपन्यांच्या हेअर रिलॅक्सर प्रोडक्टबाबत आरोप केले गेले आहेत. या आरोपांमध्ये असे म्हणले आहे की, हेअर रिलॅक्सर प्रोडक्टमध्ये असे केमिकल्स आहेत, ज्याच्या वापराने गर्भाशयाचा कॅन्सर आणि अन्य आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. ज्यामुळे अमेरिका आणि कॅनडात या विरोधात तब्बल 5400 खटले दाखल करण्यात आले आहेत.