Friday, June 2, 2023

महाराष्ट्रातील ‘या’ हाॅस्पिटलमध्ये तब्बल 82 डाॅक्टरांना कोरोनाची लागण; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

सांगली | मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या आणखी 50 जणांचे करोना चाचणी अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. यामुळे करोना बाधित शिकाऊ डॉक्टरांची संख्या 82 झाली असल्याचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ. रुपेश शिंदे यांनी सांगितले.

मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या व मुला-मुलींच्या वसतिगृहात वास्तव्य करीत असलेल्या सर्व 210 जणांचे स्वँब करोना चाचणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी आतापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालापैकी 82 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अद्याप 50 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

करोना संसर्ग झालेल्या सर्वच रुग्णांचे स्वँब ओमायक्राँन तपासणी साठी पुणे व दिल्ली प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येण्यास अद्याप दोन ते दिवस लागतील असे डॉ. शिंदे यांनी सांगितले. बाधित रुग्णांना कोव्हीड रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना करोनाची कोणतीही तीव्र लक्षणे नसल्याचे डॉ. शिंदे म्हणाले.