रशियाने युक्रेनवर हल्ला करताच गोल्ड-क्रूडसह ‘या’ वस्तू महागल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणावाचे आज अखेर युद्धात रूपांतर झाले. गुरुवारी सकाळी रशियाने युक्रेनची राजधानी कीववर मिसाईल डागण्यास सुरुवात केल्यावर कमोडिटी मार्केटमध्येही तेजी आली.

गुरुवारी सकाळी जागतिक बाजारात सोने-चांदी, डॉलर, क्रूड, नैसर्गिक वायू, निकेल, अ‍ॅल्युमिनियम यासह सर्वच वस्तूंच्या किंमती अचानक वाढल्या. दोन्ही देशांमधील युद्ध जर दीर्घकाळ चालले तर कमोडिटी मार्केटवरील संकट आणखी गडद होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्याचा परिणाम भारतासह जगभरातील रिटेल मार्केटवरही दिसून येईल.

सोने आणि चांदी
रशियाने कीववर मिसाईल डागताच सोन्या-चांदीच्या किंमती वाढू लागल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत 2.15 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर चांदीची किंमतही 2 टक्क्यांहून अधिकने वाढली आहे. सोन्याचा भाव सध्या $1,935 प्रति औंस आहे तर चांदी $25 प्रति औंस दराने विकली जात आहे. त्यामुळेच भारतीय सराफा बाजारातही सोन्याने 51 हजार आणि चांदीने 69 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपया 60 पैशांनी तुटला
आंतरराष्ट्रीय बाजारात संकट वाढत असताना भारतीय चलनही डॉलरच्या तुलनेत घसरले. परकीय चलन बाजारात (फॉरेक्स) सकाळी 11.05 वाजता डॉलरच्या तुलनेत रुपया 0.59 टक्क्यांनी घसरून 75.23 वर आला. 23 फेब्रुवारी रोजी तो 74.63 रुपयांवर बंद झाला होता. म्हणजेच रुपया जवळपास 60 पैशांनी घसरला आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती $100 च्या पुढे
सर्वात मोठे संकट कच्च्या तेलावर दिसून येत आहे. रशियन मिसाईल्सनी कच्च्या तेलाच्या किंमतींना आग लावली आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींनी आठ वर्षांत पहिल्यांदाच 100 डॉलर प्रति बॅरलचा आकडा पार केला. सकाळच्या ट्रेडिंगच्या वेळी, क्रूड 5.2 टक्क्यांच्या वाढीसह $100.04 प्रति बॅरलवर विकले जात होते.

नैसर्गिक वायूचे दरही गगनाला भिडले आहेत
आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किंमतीतही 6 टक्क्यांहून अधिकने वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी, अमेरिकन बाजारात नैसर्गिक वायू 6.32 टक्क्यांनी वाढून $4.88 प्रति घन सेंटीमीटर होता.

धातूंची चमकही वाढली
कमोडिटी मार्केटमध्ये निकेल आणि अ‍ॅल्युमिनियमसारख्या धातूंच्या किंमती ही अचानक वाढल्या. गुरुवारी सकाळी निकेलची किंमत 2.01 टक्क्यांनी वाढली, म्हणजे सुमारे 600 रुपये प्रति टन. एका दिवसापूर्वी तो 2.74 टक्क्यांनी घसरून 24,944 रुपयांवर बंद झाला होता. त्याचप्रमाणे, अ‍ॅल्युमिनियमचे दरही 2 टक्क्यांनी वाढले आहेत, म्हणजे सुमारे 64 रुपये प्रति टन.

Leave a Comment