“पंतप्रधानांना आता ‘द कश्मीर फाइल्स’ पाहून काश्मिरी पंडितांच्या दु:खाची आठवण झाली का?”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून महाराष्ट्रातही अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांच्यात खडाजंगी झाली. तर दुसरीकडे देशातील राजकारणात विरोधकांकडून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, एमआयएम प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. “गेल्या सात वर्षांपासून सत्तेत असलेल्या देशाच्या पंतप्रधानांना एखादा चित्रपट पाहून काश्मिरी पंडितांच्या दु:खाची आठवण झाली का? “काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित मारले गेले, त्यांच्यावर अत्याचार झाला. पण जे 1500 हिंदू मारले गेले त्यांच्यासाठी अश्रू कोण ढाळणार?” असा प्रश्न ओवेसी यांनी मोदींना केला आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित मारले गेले, त्यांच्यावर अत्याचार झाला हे मान्य आहे. एकूण 209 काश्मिरी पंडित मारले गेले. माझ्याकडे सगळ्यांची नावं आहेत, जी मी देऊ शकतो. पण जे 1500 हिंदू मारले गेले, जे काश्मिरी पंडित नव्हते, जे डोग्रा भागातील होते, त्यांच्यासाठी अश्रू कोण ढाळणार?

वास्तविक नुकताच प्रदर्शित झालेला ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक मुस्लिमांविरोधात व्हिडीओ बनवत आहेत. देशात मुस्लिमांविरुद्ध द्वेष का वाढवला जात आहे? सोशल मीडियावर असे किती व्हिडीओ पडले आहेत, ज्यात लोक सिनेमागृहात उभे राहून मुस्लिमांच्या विरोधात भाषण करत आहे, असेही यावेळी ओवेसी यांनी म्हंटले.

Leave a Comment