वरच्यांच्या परवानगीशिवाय लखीमपूरची घटना शक्य नाही; ओवेसींचा भाजपवर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लखीमपूर हिंसाप्रकरणी एमआयएम चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपला जबाबदार धरत केंद्र सरकारवर टीका केली आहे. वरच्यांच्या परवानगीशिवाय हे कृत्य शक्य नाही असे ओवेसी यांनी म्हंटल. तसेच त्यांनी पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले आहेत

ओवेसी म्हणाले, या प्रकरणाला घटना म्हणता येणार नाही. ही पूर्णपणे नियोजनासह केलेली हत्या आहे. पूर्णपणे नियोजनाद्वारे हे कृत्य करण्यात आले असे ओवेसी यांनी म्हंटल. भाजपा आणि आरएसएसमध्ये कोणतेही काम होते ते वरच्यांच्या परवानगीशिवाय होत नाही. पूर्णपणे नियोजनाद्वारे निष्पाप शीख शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्यात आले असा आरोप ओवेसी यांनी केला

भाजपा सरकार कोणाला मूर्ख बनवत आहे. नरेंद्र मोदी किंवा योगी आदित्यनाथ मिश्रा यांचा संबंध एका उच्च जातीसोबत असल्याने त्यांना वाचवत आहे. पंतप्रधानांनी अजय कुमार मिश्रा यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे. जर आरोपी मंत्र्याचा मुलगा असेल तर न्याय कसा मिळेल, असा सवालही ओवेसी यांनी केलाय.

You might also like