व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

विखे पाटलांचे संपूर्ण कुटुंब एकेकाळी काँग्रेसमध्येच होते; अशोक चव्हाणांकडून कानउघाडणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस नवरा, शिवसेना बायको आणि काँग्रेस म्हणजे बिनबुलाये वऱ्हाडी अशी टीका भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी केल्यानंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सुजय विखेंचा समाचार घेतला. सुजय विखे पाटील यांचं संपूर्ण कुटुंब एकेकाळी काँग्रेस मध्येच होत याचे भान ठेवा अस अशोक चव्हाण यांनी म्हंटल

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे सहकुटुंब तुळजापूरला तुळजा भवानी देवीच्या दर्शनाला आले होते. त्यावेळी त्यांना विखे पाटील यांनी काँग्रेस बाबत केलेल्या विधानाबाबत विचारले असता अशोक चव्हाण म्हणाले, सुजय विखे हे राजकारणात नवखे आहेत. राजकारणात त्यांची नुकतीच सुरवात झाली आहे. ज्या काँग्रेसवर ते आता टीक करत आहेत, एकेकाळी ते आणि त्यांचे कुटुंबीय काँग्रेसमध्ये होते. यामुळे अशी टीका करण्यापेक्षा सुजय विखे यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असा सल्ला अशोच चव्हाण यांनी दिला.

दरम्यान, तत्पूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील सुजय विखे पाटील यांना चांगलेच सुनावले. सुजय विखे पाटील वर जास्त बोलणं योग्य नाही, पण ज्या भाजपचा ते खासदार आहेत त्यांचा पक्ष आज काँग्रेसने केलेल्या विकासावर ढोल बडवत आहे. देशाच्या स्वतंत्र काळा नंतर काँग्रेसने केलेल्या विकास कामांमुळेच आज देश प्रगतीपथावर आहे असेही नाना पटोले म्हणाले.