औरंगाबादेतील 40 रस्त्यांचे होणार लवकरच डांबरीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती या ठिकाणी असलेल्या रस्त्यांची आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक वाहनचालकांचा मृत्यू झाला आहे. आता रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी अंदाजपत्रक तयार झाले आहे. परंतु 39 रुपयांची निविदा रखडली असून पावसाळ्यानंतर रस्त्यांची कामे सुरू होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्हच आहे.

महापालिकेने आपल्या निधीतून 39 रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला असून 57 कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मागील महिन्याचा शासनाने लवकरच निविदा ही प्रसिद्ध होणार असल्याची घोषणा केली होती परंतु ऑगस्ट महिना संपत आला तरी निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

राज्य सरकारकडे रस्त्याच्या कामासाठी निधी नसल्यामुळे महापालिकेने निधीची मागणी केली होती. यावेळी 270 कोटी निधी राज्य सरकारकडून देण्यात आला. या निधीतून 58 सिमेंट आणि डांबरीकरणाची कामे करण्यात आली. त्याचबरोबर सरकारला निधी न मागता महापालिकेच्या निधीतून काही रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी घेतला. यासाठी 2021-22 या कालावधीत अर्थसंकल्पात रस्त्यांचे 100 कोटींची तरतूद करण्यात आली.

सिमेंटच्या रस्त्यांसाठी येणारा खर्च आणि पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेता प्रशासकांनी पहिल्या टप्प्यात 40 टक्के रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले. शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता बीपी फड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 40 सदस्यांची निवड करून त्याबद्दल लागणाऱ्या 57 कोटी 10 लाख 14 हजार 15 रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आलेली आहे.

Leave a Comment