‘या’ राज्यात सरकार देणार मुलीच्या लग्नात सोनं; जाणून घ्या ‘ही’ योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गुवाहाटी । लग्न सोहळ्यात वधूला सोन्याचे दागिने देण्याची प्रथा तशी जुनीच आहे. अशावेळी गरीब आई-वडिलांना आपल्या मुलीच्या लग्नात सोनं देण्यासाठी प्रचंड (Gold Price) आर्थिक ताण सहन करावा लागतो. पण आसाम राज्यात आता मुलीच्या आई-वडिलांची ही चिंता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यताआहे. कारण आसाम सरकारने राज्यातील मुलींच्या लग्नात सोनं देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अरुंधती गोल्ड योजने’ च्या माध्यमातून आई-वडिलांना आपल्या मुलीच्या लग्नात १ तोळं (10 ग्रॅम) सोन्याचा शिक्का देण्यात येणार आहे.

काय आहे अरुंधती गोल्ड योजना?
अरुंधती गोल्ड योजनेच्या माध्यमातून आसाम सरकार राज्यातील ज्या परिवारांचं वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे अशा परिवारांना 10 ग्रॅम सोन्याचा शिक्का देणार आहे. परिवारातील पहिल्या दोन अपत्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. अरुंधती गोल्ड योजनेच्या माध्यमातून विवाहाच्या नोंदणीकरणानंतर प्रत्येक विवाह झालेली मुलगी राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या या 10 ग्रॅम सोन्यच्या शिक्क्याचा लाभ घेऊ शकते.

काय करावं लागणार?
या योजनेमुळे राज्यातील मुलींना काही प्रमाणात आर्थिक सुरक्षा मिळण्याची आशा राज्य सरकारनं व्यक्त केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्पेशल मॅरेज अॅक्ट,1954 या कायद्यानुसार नोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणीच्या दिवशीच संबंधित मुलगी अरुंधती गोल्ड योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्ज करु शकते. यासाठी मुलीचं वय किमान 18 वर्षे तर मुलाचं वय किमान 21 वर्षे असायला हवं. या योजनेचा लाभ केवल अशा परिवारांना मिळणार आहे ज्यांचं उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment