सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
भावावर गुटख्याची केस दाखल असून त्यात मदत करतो. तसेच त्याला जामिनावर सोडण्यास मदत करतो. याकरीता वीस हजार रूपयांची लाच मागणी करून लाच घेताना कोरेगांव पोलिस स्टेशनच्या सहायक पोलीस उपनिरीक्षक रंगेहाथ पकडण्यात आले आहे. कोरेगांव (ता. कोरेगांव, जि. सातारा) येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर असणाऱ्या प्रल्हाद श्रीरंग पाटोळे असे लाच स्विकारताना पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नांव आहे.
पोलिस निरीक्षक आरिफा मुल्ला यांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदारांच्या भावावर गुटखा विक्री संदर्भात गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात तसेच भावाला जामिन मिळविण्यासाठी मदत करतो म्हणून प्रल्हाद पाटोळे यांनी २० हजार रूपयांची मागणी केली होती. यासंदर्भांत तक्रार दाखल झाली होती. त्याप्रमाणे आम्ही पडताळणी केली असता त्यामध्ये वीस हजार लाचेची मागणी निष्पन्न झाली. पाटोळे याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक , लाप्रवि, पुणे सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे सुहास नाडगौडा, पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला व पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पो. ना. राजे, ताटे, खरात यांनी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’