घाटी रूग्णालयातील ते 37 व्हेंटिलेटर सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | घाटी रुग्णालयाला केंद्राकडून 12 मार्च रोजी आलेले व्हेंटिलेटर काही तांत्रिक बिघाडामुळे सुरू झाले नव्हते त्यामुळे घाटीने हे व्हेंटिलेटर आयसीयू दर्जाचे नसल्याचे सांगून त्यात दोष दाखवले होते. तीन महिन्यांनी 18 व्हेंटिलेटर सुरू होते आणि 37 व्हेंटिलेटरची दुरुस्ती करून ते इन्स्टॉल केले आहेत. त्या व्हेंटिलेटरवर रुग्णांची चाचणीही यशस्वी ठरल्याचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कैलास झिने यांनी सांगितले.

व्हेंटिलेटरच्या दुरुस्तीसाठी दिल्लीवरून पथक आले होते कंपनीच्या वतीने इंजिनीअर प्रयत्न करत होते. या 37 व्हेंटिलेटरची वाळूज मध्ये दुरुस्ती करण्यात आली. व्हेंटिलेटरमध्ये आता कोणतीच अडचण नाही. रुग्णांवर यशस्वीरित्या चाचणी होता आहे . व्हेंटिलेटर चांगली असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्याचा ऑटो ट्रेन पार्ट बदलण्यात आला होता.

आता घाटीकडे 55 व्हेंटिलेटरची वाढ झाली आहे असे डॉक्टर झिने यांनी सांगितले. कोरोना काळात घाटीला केंद्राकडून 12 मार्च रोजी 100 व्हेंटिलेटर मिळाले होते. या व्हेंटिलेटरमध्ये कनेक्टर सेन्सर पाठवले नव्हते. तीन दिवसानंतर घाटीच्या अहवालात हे आयसीयू दर्जाच्या नसल्याचे समोर आले होते.

Leave a Comment