व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

त्यावेळी उध्दव ठाकरेंच्या आदेशाने आम्हांला धक्का बसला : आ. शंभूराज देसाई

कराड | सन 2019 च्या निवडणुकीनंतर ठाकरे यांनी आपल्याला महाविकास आघाडी करायची आहे, असे सांगीतले. त्यावेळी आम्हाला धक्का बसला. त्या बैठकीत ठाकरे यांनी पक्षाचा आदेश तुम्हाला मानावा लागेल, असे सांगितले. त्यानुसार महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. मी राज्यमंत्री होतो, मात्र मला अधिकारच नव्हते. आमदार असताना जेवढा निधी आणला, तेवढा राज्यमंत्री असताना मला निधी आणता आला नाही, ही खंत आम्ही ठाकरे यांना सांगीतली. मात्र त्यांनी आपल्याला तीन पक्षाचे सरकार चालवायचे आहे, असे वारंवार सांगितले जायचे. मतदार संघाच्या आमदाराला काही अधिकार नसतील तर हे किती दिवस सहन करायचे? म्हणून आम्हीच 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना निर्णय घ्याला भाग पाडले, असल्याचा गाैप्यस्फोट उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला.

उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची कॅबीनेट मंत्रीपदासह ठाणे आणि सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड केल्याबद्दल त्यांचा मुंबईकर रहिवासी मित्रमंडळातर्फे संत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले, जयवंत शेलार, माजी नगरसेवक किशोर पाटकर, दमयंती आचरे, माजी उपमहापौर अशोक गावडे, आबासाहेब देसाई, प्रकाश देसाई, रयत कारखान्याचे संचालक प्रदीप पाटील, चंद्रकांत चाळके, संतोष जाधव, जयवंत जाधव यांच्यासह मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, राज्यातील मोठा जिल्हा म्हणून परिचीत असणारा ठाणे आणि स्वतःच्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दिले आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाला ताठ मानेने मुंबईत राहता आले पाहिजे. कुणाची लाचारी पत्करली नाही पाहिजे, ही भुमिका बाळासाहेब देसाई यांची होती. तीच भुमिका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. शिवसेना उभी करण्यासाठी बाळासाहेब देसाईंनी मोठे सहकार्य केले. बाळासाहेब देसाईंचा नातु म्हणुन शंभुराज देसाई हे लाल दिव्याच्या गाडीतुन फिरले पाहिजे, यासाठी ठाकरे यांनी मला राज्य सहकार परिषदेचे अध्यक्षपद दिले. त्यांच्याशी आमची निष्ठा आहे.

राष्ट्रवादीचे खासदार मागील पत्र जोडतात अन् कामाचे श्रेय घेतात : आ. शंभूराज देसाई
सातारा जिल्ह्यात काम करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा हस्तक्षेप, उपमुख्यमंत्री कार्यालयाचा हस्तक्षेप व्हायचा. शासनाकडुन कामे आम्ही मंजुर करुन आणायचे आणि खासदारांनी काम मंजुर झाले की मागील तारखेचे पत्र त्याला जोडुन गावागावात जावुन काम आम्हीच मंजुर करुन आणले असे सांगायचे. त्यांच्या जोडीला भविष्यात होवु घातलेले आमदार त्यानी जायचे आणि आमच्या कामाचे नारळ फोडुन उपमुख्यमंत्री यांच्याकडून निधी आम्ही आणला असे सांगायचे. यावेळी खा. श्रीनिवास पाटील आणि जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजित पाटणकर यांनाही टोला शंभूराज देसाई यांनी लगावला.