व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Atal Pension Yojana : ‘या’ सरकारी योजनेत दरमहा 210 रुपये जमा करून मिळवा मासिक पेन्शन !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Atal Pension Yojana  : बहुतेक नोकरदार माणसाला रिटायरमेंटनंतरच्या आर्थिक सुरक्षेची काळजी असते. भविष्यात अशी चिंता करावी लागू नये, यासाठी योग्य वेळेत त्यासाठीचे प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. जर आपल्याला रिटायरमेंटनंतरही आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल तर सरकारच्या अटल पेन्शन योजनेविषयी जाणून घ्या. यामध्ये पती-पत्नी दोघानांही जॉईंट अकाउंटद्वारे 10,000 रुपये मासिक पेन्शन मिळवता येईल.

Atal Pension Yojana Tax Benefits | Alankit.in Blog

तर अटल पेन्शन योजना ही एक सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत आपल्याला किमान 1,000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये तर जास्तीत जास्त 5,000 रुपये पेन्शन मिळेल. यामध्ये दर 6 महिन्यांनी फक्त 1239 रुपयांची गुंतवणूक करून 60 वर्षानंतर प्रति महिना 5000 रुपये आजीवन पेन्शन मिळेल. याची सरकार कडून गॅरेंटी देखील मिळेल. त्याचबरोबर जर पती-पत्नी दोघांनीही गुंतवणूक केली तर वर्षाला 1.2 लाख रुपये पेन्शन मिळेल. Atal Pension Yojana

Here's how to open Atal Pension Yojana account – viralbob

कोण कोण लाभ घेऊ शकतील ???

18 – 40 वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिकाला या योजनेमध्ये गुंतवणूक करता येईल. यामध्ये जर आपण वयाच्या 18 व्या वर्षी 5,000 रुपयांच्या मासिक पेन्शनसाठी सामील झालो तर दरमहा फक्त 210 रुपये द्यावे लागतील. मात्र हीच रक्कम दर 3 महिन्यांनी जमा करायची असेल तर 626 रुपये आणि 1,239 रुपये 6 महिन्यांत भरावे लागतील. जर आपले वय 18 वर्षे असेल आणि या योजनेतून 1000 रुपये मासिक पेन्शन हवी असेल तर फक्त 42 रुपये दर महा द्यावे लागतील.

Government Pension Scheme Plan One Can Withdraw Two Family Pensions Details  Here

लहान वयात जास्त नफा

जर आपण वयाच्या 35 व्या वर्षी 5,000 रुपये पेन्शनसाठी या योजनेत सामील झालो तर 25 वर्षापर्यंत दर 6 महिन्यांनी तुम्हाला 5,323 रुपये जमा करावे लागतील. अशा परिस्थितीत आपली एकूण गुंतवणूक 2.66 लाख रुपये होईल ज्याद्वारे आपल्याला 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळेल. तर दुसरीकडे जर आपण वयाच्या 18 व्या वर्षी त्यामध्ये सामील झालो तर आपली एकूण गुंतवणूक फक्त 1.04 लाख रुपये असेल. Atal Pension Yojana

99,772 Pension Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock

Atal Pension Yojana ची वैशिष्ट्ये जाणून घ्या…

यामध्ये पेमेंटसाठी तीन पर्याय आहेत. म्हणजेच आपल्याला मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही स्वरूपात रक्कम जमा करता येईल.

अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत देखील मिळते.

यामध्ये एका सदस्याच्या नावाने फक्त एकच खाते उघडले जाईल.

जर सदस्याचा मृत्यू 60 वर्षापूर्वी किंवा नंतर झाला असेल तर पेन्शनची रक्कम त्याच्या पत्नीला दिली जाईल.

जर पती-पत्नी दोघांचा मृत्यू झाला, तर सरकार नॉमिनीला पेन्शन देईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://web.umang.gov.in/landing/department/atal-pension-yojana.html

हे पण वाचा :

Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने गेल्या 2 वर्षात दिला 3200% रिटर्न !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजची नवीन किंमत तपासा

खुशखबर !!! Indusind Bank कडून फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ

PF Account : आता घरबसल्या अशा प्रकारे जनरेट करा UAN नंबर !!!

Online fraud : बनावट क्रिप्टो एक्सचेंजने फ्रॉडद्वारे भारतीय गुंतवणूकदारांचे लुटले 1000 कोटी रुपये – रिपोर्ट