एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला; आरोपीने ओठांचा चावा घेत चावून तोडले ओठ

मुंबई | एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने भिवंडीमध्ये एका तरुणीवर हल्ला केला. मुक्तार अन्सारी नावाच्या तरुणाने तरुणीचे ओठ चावले. व घेतला गेलेला चावा एव्हढा भयानक होता की तरुणीचे दोन्ही ओठ चेहऱ्यापासून वेगळे झाले होते. या घटनेवर परिसरातून संताप व्यक्त केला जातो आहे.

मुक्तार अन्सारी या तरुणांचे त्याच्याच परिसरात राहत असलेल्या एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. मागील एक वर्षापासून संबंधित तरुण हा तरुणीला त्रास देत होता. मात्र मुलीचा त्याच्या प्रेमाला विरोध होता. त्यामुळे एक दिवस खरेदीसाठी बाजाराला जात असताना तरुणीला मध्येच अडवून आणि बाजूच्या गल्लीमध्ये ओढून नेत तिच्या ओठांचा जबरदस्त चावा घेतला. चावा इतका जास्त होता की मुलीचे दोन्ही ओठ तुटून बाजूला झाले.

मुलीला भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले होते मात्र जखम मोठी असल्याने आणि रक्तस्राव जास्त होत असल्याने तरुणीला केईएम रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. याप्रकरणी विकृत तरुणांसह त्याच्या मित्रावर शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमात अनेक विकृत घटना होत असतात. यासुद्धा विकृत घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

You might also like